Ad will apear here
Next
श्यामराव भिडे कार्यशाळेत दिव्यांग दिन उत्साहात
टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करताना शामराव भिडे कार्यशाळेतील विद्यार्थीरत्नागिरी : येथील आविष्कार संस्थेच्या श्यामराव भिडे कार्यशाळेत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘क्षण रंगलेले’ हा कार्यक्रम  आयोजित केला होता.

या वेळी विद्यार्थ्यांचे गट करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांना वाव देत विविध चित्रे रेखाटली. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू करताना वर्तमानपत्रांपासून फ्लॉवर पॉट, टाकाऊ बाटल्यांपासून विविध फुले, रिकाम्या दूध पिशव्यांपासून गजरा, रंगीत पेपरपासून चायना स्टिक, वह्यांच्या पुठ्ठ्यांपासून घर, कागदाच्या लगद्यापासून मुकुट, मिनरल बॉटलपासून ज्वेलरी आदींची निर्मिती या मुलांनी केली. त्याचप्रमाणे खेळाच्या चिठ्ठ्या टाकून त्यानुसार टाळ्यांचे विविध प्रकार, प्राणी-पक्षी यांचे आवाज, पारंपरिक खेळ, मानवनिर्मित गाड्यांचे आकार, बडबड गीते, गाण्याच्या बोलावर नृत्य, मूक अभिनय सादर केले.

स्वप्नाली सावंतदेसाई यांनी त्यांचे भाऊ नंकुमार देसाई यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षाप्रमाणे विद्यार्थ्यांना खाऊ देऊन या कार्यक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी सर्व निदेशक, मदतनीस यांनी मेहनत घेतली. निदेशक नेहा शिवलकर यांनी या वेळी कविता सादर केली. भिडे कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी सर्वांचे आभार मानले. 

(आविष्कार संस्थेविषयी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZYIBV
Similar Posts
भिडे कार्यशाळेत हर्षयामिनी निवास प्रकल्पाचे आयोजन रत्नागिरी : आविष्कार संस्थेच्या श्यामराव भिडे कार्यशाळेत हर्षयामिनी हा निवास प्रकल्प राबविण्यात आला. यात ‘जादू की दुनिया मॅजिका’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जादूगार विनयराज उपरकर यांनी आपल्या जादुई कौशल्याने कार्यशाळेचे विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांवर जादू केली. विद्यार्थ्यांनी चांदण्या रात्री सहभोजनाचा आस्वाद घेतला
‘आविष्कार’च्या वस्तू एक नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध रत्नागिरी : दर वर्षीप्रमाणे याही वर्षी आविष्कार संस्थेच्या श्री. शामराव भिडे कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पणत्या, आकाशकंदील आदी वस्तूंची स्टॉलच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे. ३१ ऑक्टोबर २०१८ जयगड येथील जेएसडब्ल्यू एनर्जी येथे, तर एक ते चार नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत रत्नागिरी शहरातील स्वा
भिडे कार्यशाळेत ‘पाणी वाचवा’ संदेश देत रंगोत्सव साजरा रत्नागिरी : येथील आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेमध्ये दर वर्षी शिमगोत्सव आणि रंगोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला जातो. या वर्षीही ‘पाणी वाचवा’ असा संदेश देत रंगपंचमी साजरी करण्यात आली.
निसर्गरक्षणाचा संदेश देणाऱ्या राखीचा ‘आविष्कार’ रत्नागिरी : मतिमंदांसाठी कार्यरत असलेल्या आविष्कार संस्थेच्या श्यामराव भिडे कार्यशाळेतील विद्यार्थी यंदा लागवड करता येण्यायोग्य बीजराख्या म्हणजेच प्लांटेबल सीड राख्या तयार करत आहेत. रक्षाबंधन झाल्यानंतर या राख्या कुंडीत किंवा मातीत घातल्यास त्यातून फुले-फळे देणाऱ्या वनस्पती रुजणार आहेत. या पर्यावरणपूरक

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language